Books

पैशांविषयी बोलू काही

आपण पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करतो; पण कितीही कमावले, तरी पैशांची चिंता काही दूर होत नाही. बिले, भाडे, कर्जाचे हप्ते, वैद्यकीय कारणांसाठी होणारा खर्च, सुट्टीतील खर्च, मुलांची शिक्षणे यांबरोबरच निवृत्तीनंतर पैसे कमी पड़तील की काय याची भीती सतत मनात असते. आपण जसे पैशासाठी कष्ट करतो तसे त्यानेही आपल्यासाठी काही केले तर ते किती सुखदायक होईल, नाही? चुकीच्या गुंतवणुकीआधीच कळायची काही व्यवस्था असेल तर? एखाद्या साध्या, गुंतागुंत नसलेल्या योजनेत सहज पैसे गुंतवून आपल्या पैशाचा चांगला मोबदला मिळाला आणि आजचेही आयुष्य सुखकर करता आले तर ?

तुमची आर्थिक सुरक्षा योग्य मार्गावर राहण्यासाठी भारताच्या वैयक्तिक वित्त क्षेत्रातील सगळ्यात विश्वासू नाव असलेल्या मोनिका हालन तुम्हाला काही तंत्र शिकवू पाहताहेत. हे पुस्तक तुम्हाला झटपट श्रीमंत कसे व्हावे हे शिकवत नाही; पण योग्य गुंतवणूक कुठली असेल याची धास्ती न बाळगता तुमच्या स्वप्नातील आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग तुम्हाला दाखवते. ‘पैशांविषयी बोलू काही’ हे पुस्तक इतर वित्तीय पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. कारण, भारतीय संदर्भ डोक्यात ठेवून ते मुद्दाम तुमच्यासाठी लिहिले गेले आहे.

Publisher: Madhushree Publication

Paperback: 217 pages

Language: Marathi

Your money box is half done till you have made a will. Nominations are not enough. Will it if you care.